Vijayapura

आरएसएस वादावरून खासदार जिगजिणगी आणि खर्गे समर्थकात वाद

Share

आरएसएस संदर्भात अवमानकारक शब्द वापरणाऱ्या खर्गे समर्थकाला विजापूरचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी फोनवरून चांगलेच सुनावले असून या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये भाजप खासदार रमेश जिगजिणगी आणि मंत्री प्रियांक खर्गे यांच्या समर्थकामध्ये थेट वाद झाल्याचे ऐकायला मिळत आहे. “मी दलित असूनही भाजपमध्ये कार्यरत आहे आणि आरएसएसची निंदा केल्याने कोणीही मोठे होत नाही,” अशा शब्दांत खासदार जिगजिणगी यांनी आपला आक्षेप नोंदवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा मंत्री प्रियांक खर्गे यांना कोणताही अधिकार नाही, असेही त्यांनी या संभाषणात स्पष्ट केले.

या संदर्भात आपण स्वतः मंत्री खर्गे यांनाही योग्य सल्ला दिल्याचा उल्लेख खासदार जिगजिणगी यांनी केला आहे. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यावरून राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Tags: