तिजोरीत खडखडाट असल्यामुळे गॅरंटी योजना पुढे सुरू ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची मानसिकता नाही, असा गंभीर आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी केला आहे. केवळ प्रचारासाठी विधाने करणाऱ्या मंत्री प्रियांक खर्गे यांना सरकार चालवण्याचे ज्ञान नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

फक्त निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने या योजना लागू करण्यात आल्या होत्या, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी म्हटले. सध्या कंत्राटदारांची ३० ते ४० हजार कोटी रुपयांची बिले थकीत असून गेल्या चार वर्षांचा निधी अद्याप मिळालेला नाही. आम्ही गॅरंटी योजनांचे विरोधक नाही, मात्र यामुळे विकासकामे ठप्प झाली असून सरकार या योजना अप्रत्यक्षपणे बंद करण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला.

आरएसएस संघटनेबाबत बोलताना जगदीश शेट्टर यांनी मंत्री प्रियांक खर्गे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. आरएसएस ही एक देशभक्त संघटना असून, तिच्याबद्दल समाजात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेले खर्गे केवळ राजकीय फायद्यासाठी अशी विधाने करत असल्याचे शेट्टर यांनी म्हटले.


Recent Comments