बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू असलेल्या नूतनीकरण आणि विविध विकासकामांची सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.


कार्यालय परिसराचे सौंदर्यीकरण करतानाच दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कार्यालय आवारात उभारण्यात येत असलेल्या नवीन ध्वजस्तंभाच्या कामाची मंत्र्यांनी पाहणी केली. तसेच, कन्नड भाषेचा अभिमान असलेल्या ऐतिहासिक ‘हल्मिडी शिलालेखा’च्या प्रतिकृतीची सद्यस्थिती आणि तिच्या संरक्षणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.


जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी सुसज्ज रस्ते आणि विस्तीर्ण पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नकाशाच्या माध्यमातून या आराखड्याची माहिती दिली.

या वेळी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments