बेळगाव दक्षिण मतदारसंघातील एसपीएम रोड आणि जुना पी.बी. रोड यांना जोडणाऱ्या नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

या कामासाठी सुमारे १ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले असून यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार पाटील यांनी कंत्राटदार धामणेकर आणि सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचे आभार मानले. वॉर्ड क्रमांक १६ चे नगरसेवक राजू भातकांडे यांनी या रस्त्याच्या कामासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या उद्घाटन समारंभास माजी महापौर मंगेश पवार, माजी उपमहापौर वाणी जोशी, नगरसेवक गिरीश धोंगडी, श्रीशैल कांबळे, जितू देवाण, संतोष जैनोजी यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.




Recent Comments