Belagavi

बेनकट्टीत सराफी दुकानात चोरीचा प्रयत्न अंगलट

Share

बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील बेनकट्टी गावात भरदिवसा सराफी दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

बेनकट्टी गावातील एका सराफी दुकानात काही महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या होत्या. दुकानदाराचे लक्ष विचलित करून या महिलांनी सोन्याचे दागिने अत्यंत चलाखीने स्वतःच्या तोंडात लपवून दुकानातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदाराला संशय आल्याने त्याने स्थानिकांच्या मदतीने महिलांना पकडले आणि त्यांची झडती घेतली असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी महिलांना खांबाला बांधून ठेवले. घटनेची माहिती मिळताच यरगट्टी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Tags: