Belagavi

रुद्रप्पा लमाणी यांना मंत्रिमंडळात स्थान द्या; बंजारा समाजाची बेळगावात आक्रमक मागणी

Share

राज्य काँग्रेस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात बंजारा समाजाचे आमदार रुद्रप्पा लमाणी यांना मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी बंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष एम. पी. राठोड यांनी केली आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष रुद्रप्पा लमाणी यांना डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळायला हवे, अशी मागणी करण्यात आली. बंजारा समाजाला डावलल्यास आगामी तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा एम. पी. राठोड यांनी दिला.

राज्यात ६० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाला मंत्रिमंडळ दर्जाचे स्थान मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे एम. पी. राठोड यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेला देवेंद्र नायक आणि पांडुरंग नायक प्रामुख्याने उपस्थित होते. बंजारा समाजाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात कर्नाटकातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: