Vijayapura

गृहमंत्री प्रियांक खर्गेंच्या आरोपांना विजापूर भाजपकडून चोख उत्तर

Share

शासकीय अनुदान घेऊ इच्छिणाऱ्या संस्थाच केवळ आपली नोंदणी करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारकडून कोणतीही मदत घेत नसल्याने त्यांना नोंदणीची अजिबात गरज नाही, असे प्रतिपादन विजापूर भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलींगप्पा अंगडी यांनी केले आहे.

विजापूर येथील जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुलींगप्पा अंगडी बोलत होते. १९२५ पासून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच कायदेशीर चौकटीत राहून काम केले असून, संघाविरुद्ध दाखल झालेल्या अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयानेही संघाच्या बाजूने निकाल दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी संघावर विनाकारण आरोप करण्यापेक्षा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकडे अधिक लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

याच पत्रकार परिषदेत भाजप नेते चिदानंद चलवादी यांनी खासदार रमेश जिगजिणगी यांनी खर्गे कुटुंबाविरुद्ध कोणतेही अवमानास्पद वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले. तर, भाजप एस्सी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मंजुनाथ मीसे यांनी केवळ राजकीय फायद्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध सातत्याने अशी विधाने केली जात असल्याचा आरोप केला.

या पत्रकार परिषदेला ईरण्णा राऊर, विजय जोशी यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात या मुद्द्यावरून कर्नाटकातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: