Belagavi

गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटणारी उत्तर प्रदेशातील ११ जणांची टोळी गजाआड

Share

राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी करून त्यांचे लक्ष विचलित करत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली असून, बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.अथणी आणि कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांचे सामान सांभाळण्याच्या बहाण्याने बॅगांमधील दागिने लांबवण्याचे प्रकार घडले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या टोळीला अटक केली. संशयितांकडून कागवाड येथील ४, चिकोडीतील १ आणि अथणी येथील १ अशा एकूण ६ गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यांच्याकडून २२५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

भविष्यात अशा चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील आणि साध्या वेशातील पोलीस तैनात केले जातील, असे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी स्पष्ट केले. तसेच प्रवाशांनी, विशेषतः महिलांनी प्रवासादरम्यान आपल्या दागिन्यांची व सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags: