Belagavi

संकेश्वरमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; दोघे ताब्यात

Share

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात अनैतिक संबंधाच्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. बाबू भुसगोळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मृताचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून त्या महिलेच्या पतीने आणि त्याच्या एका मित्राने मिळून बाबू भुसगोळ याच्या डोक्यात दगड घालून तसेच चाकूने वार करून त्याचा खून केला. अनैतिक संबंधांव्यतिरिक्त रस्ता अतिक्रमणाचा वाद आणि मृताच्या त्रासाला कंटाळून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. संकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: