विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक वातावरण सुधारण्याच्या उद्देशाने चिकोडीच्या सीटीई संस्थेच्या श्रीमती डी. के. शहा कन्नड आणि मराठी प्राथमिक शाळेला संस्थेचे उपाध्यक्ष विजय मांजरेकर यांनी पाणी शुद्धीकरण उपकरण भेटीदाखल दिले.


शाळेत आयोजित कार्यक्रमात या उपकरणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना विजय मांजरेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.


याच कार्यक्रमात गणित विषयात पीएच.डी. पदवी मिळवल्याबद्दल स्वाती एस. जोशी आणि बुलबुल विभागात राष्ट्रीय पातळीवरील ‘गोल्डन ॲरो’ पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रावणी अज्जनकट्टी व एच. एस. कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी सी.टी.ई. संस्थेचे अध्यक्ष, संचालक, आर. व्ही. कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, एस. जी. जहागीरदार, मिथुन देशपांडे, संकेत मांजरेकर, शोभा मांजरेकर, गौरी मांजरेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments