बेळगाव शहरातील खासबाग परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शहापूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली आहे.

बेळगाव शहरातील खासबाग येथील सीमा वंजारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या मलिक खलील हुबळी (वय २६) आणि रियान मैनोद्दीन दफेदार (वय १८) या दोन चोरांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून १ लाख ७२ हजार ८०० रुपये किमतीचे ९.११० ग्रॅम सोन्याचे आणि २३५.३२० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एस. सिमानी, उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार, महिला उपनिरीक्षक एस. एन. बसवा आणि पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून बेळगावच्या पोलीस आयुक्तांनी या कामगिरीबद्दल संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.


Recent Comments