Belagavi

बेळगावात वाहतूक पोलिसांची कडक कारवाई

Share

बेळगाव शहरात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने वाहतूक पोलिसांनी टोइंग करून जप्त केली आहेत.

बेळगाव शहरात हेल्मेट सक्तीच्या मोहिमेबरोबरच वाहतूक पोलिसांनी आता चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील रस्त्यावर नो पार्किंगच्या जागेत लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी टोइंग व्हॅनच्या साहाय्याने ही सर्व वाहने उचलून थेट पोलीस ठाण्यात जमा केली आहेत.

शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि कोंडीवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. असे असतानाही काही मालवाहू वाहने नो पार्किंगच्या जागेत उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत होती. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनांवरही पोलिसांनी कारवाई करत ती जप्त केली आहेत.

Tags: