बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या २२ जून रोजी आयोजित महामोर्चाला परवानगी नाकारली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना अधिकृत पत्र पाठवून हा निर्णय कळवण्यात आला आहे. समितीने ८ जून रोजी धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी परवानगी मागितली होती.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन आणि विविध भाषिक समाजांमध्ये तणाव निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच मोर्चाच्या प्रस्तावित मार्गामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना त्रास होऊ शकतो, असे कारण पोलीस प्रशासनाने दिले आहे. कर्नाटक पोलीस अधिनियम आणि राज्यघटनेतील तरतुदींनुसार सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, समितीला केवळ शिष्टमंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची परवानगी देण्यात आली आहे.


Recent Comments