Belagavi

बेळगावात ११ महिन्यांच्या बाळाच्या उपचारासाठी पालकांची मदतीची हाक

Share

बेळगाव येथील एका ११ महिन्यांच्या बालकावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असून, उपचाराच्या खर्चासाठी गरीब पालकांनी देणगीदारांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. या बालकावर सध्या बेळगावच्या केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेळगावमधील एका सर्वसामान्य कुटुंबातील सलमान अब्दुल अहमद शाह यांच्या ११ महिन्यांच्या मुलाला जन्मापासूनच अन्ननलिकेचा त्रास आहे. जन्मानंतर त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली होती, मात्र आता हा त्रास पुन्हा वाढल्यामुळे त्याला बेळगावच्या केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बालरोग शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल ए. पट्टणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही तातडीची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या उपचारासाठी कर्नाटक सरकारच्या “आयुष्मान भारत-आरोग्य कर्नाटक” योजनेतंर्गत ५० हजार रुपयांची मंजुरी मिळाली आहे. मात्र, शस्त्रक्रियेचा एकूण खर्च पाहता आणखी ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे.

अल्पमुदतीत एवढी रक्कम उभी करणे गरीब पालकांसाठी कठीण झाले आहे. आपल्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी वडील सलमान यांनी दानशूर व्यक्तींकडे आर्थिक मदतीची याचना केली आहे.

या चिमुरड्याच्या उपचारासाठी मदत करू इच्छिणारे नागरिक ९५३८९२७०५३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीने आर्थिक मदत पाठवू शकतात, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

Tags: