Belagavi

अमन नगरमधील उर्दू शाळेसाठी जागा देण्याचे आमदारांचे आश्वासन

Share

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच यश शक्य आहे, असे प्रतिपादन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी केले. ते शम्स एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित एसएसएलसी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

या वेळी आमदार आसिफ सेठ यांनी २००८ मधील विकासकामांची आठवण करून देत, अमन नगरमधील उर्दू शाळेसाठी १० गुंठे जागा खरेदी करून देण्याचे आश्वासन दिले.

नगरसेवक अझीम पटवेगार यांनी न्यू गांधी नगर आणि अमन नगरच्या विकासाचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घ्यावे आणि पालकांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत, असे आवाहन केले.

ट्रस्टचे पदाधिकारी नझीर अहमद पटवेगार यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थितीमुळे गरीब मुले शिक्षण अर्धवट सोडतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आघाडीवर आणण्यासाठी आमची संस्था आणि सर्व जमात सदैव कार्यरत राहील.

या कार्यक्रमाला क्षेत्र शिक्षणाधिकारी रवी भजंत्री, मकानदार, हिरेमठ, समीर, अब्दुल अझीझ बागवान, राजासाब बागवान, शब्बीर देसाई, उप्पार, नाईक, मुश्ताक मौलाना आणि आसिफ अत्तार यांच्यासह स्थानिक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: