State

“दिल्लीला गेलात तर हायकमंड राजीनामा मागेल”; प्रियांका खर्गेचा टोला

Share

कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगनंतर गृहमंत्री प्रियांका खर्गे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि आर. अशोक यांनी दिल्लीला जाऊ नये, तिथे गेल्यास हायकमंड त्यांचा राजीनामा मागेल, असा टोला खर्गे यांनी लगावला.

बंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियांका खर्गे म्हणाले की, आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ जे बोलत होते, ते आता खरे ठरले आहे. विजयेंद्र आणि अशोक यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळेच भाजपच्या ७ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. काँग्रेसने कोणालाही आमिष दाखवलेले नाही, तर भाजपच्या अंतर्गत नाराजीतूनच हे मतदान झाले आहे.

राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांच्या पुनरावलोकनाबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, सरकार थेट जनतेच्या दारात पोहोचून काम करत आहे. प्रत्येक योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळाला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे गॅरंटी योजनांच्या पात्रतेचे निकष बदलण्यात काहीही चुकीचे नाही, असे सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.

Tags: