Belagavi

आंदोलनासाठी येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा ‘मशाल मोर्चा’

Share

कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ जून रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याच्या जनजागृतीसाठी बेळगाव जवळील येळ्ळूर येथे शेकडो कार्यकर्त्यांनी रात्री मशाल मोर्चा काढला.

येळ्ळूर म. ए. समितीचे नूतन अध्यक्ष वामन पाटील, नेते रमाकांत कोंडुस्कर आणि प्रकाश अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली मशाली प्रज्वलित करून शिव सेना चौक ते महाराष्ट्र चौक दरम्यान ही निषेध रॅली काढण्यात आली.

या प्रसंगी बोलताना नेत्यांनी आरोप केला की, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर घटनात्मक अन्याय करत आहे. तसेच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकी या भागांसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या आंदोलनात प्रकाश माळुचे, अनिल हुंदरे यांच्यासह म. ए. समितीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: