Belagavi

बेळगाव: सेंट झेवियर्स शाळेत पर्यावरण दिन साजरा

Share

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेळगाव येथील प्रसिद्ध सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत शाळेच्या एनसीसी कॅडेट्सनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत विविध प्रकारची रोपे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

शाळेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

या प्रसंगी एनसीसी अधिकारी आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी हरित आणि सुदृढ पर्यावरण निर्मितीसाठी आपले योगदान देण्याची शपथ घेतली.

Tags: