Belagavi

आश्रय कॉलनीतील रहिवाशांचे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन

Share

बेळगाव येथील आश्रय कॉलनीतील रहिवाशांचा गेल्या ३० वर्षांपासूनचा वहिवाटीचा रस्ता जमीन मालकाने अचानक बंद केल्यामुळे संतप्त नागरिकांनी नामनिर्देशित सदस्य मुश्ताक मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले.

अचानक रस्ता बंद केल्यामुळे कॉलनीतील नागरिकांचे दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले असून दैनंदिन कामांसह आपत्कालीन सेवांसाठीही अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रस्ता पूर्ववत खुला करून प्रशासनाने या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

काही खाजगी व्यक्तींनी सदर जागा आपली असल्याचा दावा करत जेसीबीच्या साहाय्याने रस्ता अडवल्याचे डॉ. रोहित बामणे यांनी सांगितले. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांत तक्रार देऊनही काम सुरूच ठेवण्यात आले असून, कागदपत्रांची कायदेशीर तपासणी होईपर्यंत हा रस्ता जनतेसाठी खुला ठेवावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Tags: