Belagavi

बेळगाव महापालिकेत मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेसाठी जनजागृती कार्यशाळा

Share

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मतदार यादीची एसआयआर मोहीम सुरू होत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी केले आहे.

महापालिका सभागृहात आयोजित माहिती कार्यशाळेत ते बोलत होते. महापालिका क्षेत्रात ३० जून ते २९ जुलै दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. दक्षिण विभागासाठी स्वतः आयुक्त आणि उत्तर विभागासाठी उपायुक्त उदयकुमार तळवार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. एकूण ५१४ मतदान केंद्र अधिकारी घरोघरी भेट देऊन माहिती गोळा करणार असून, कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोकशाही बळकटीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यात नगरसेवकांनी आपल्या प्रभागात जनजागृती करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.

कार्यशाळेत दक्षिण विभागाचे साहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सभागृह नेते संतोष पेडणेकर, विरोधी पक्षनेते मोहम्मद सोहेल संगोळी यांच्यासह विविध विभागांचे उपायुक्त आणि नगरसेवक उपस्थित होते.

Tags: