बेळगाव शहरातील जुन्या बाजारपेठ भागात ‘हेरॉईन’ ची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

सत्यम सुहास हुद्दार, इर्शादअहमद सलाउद्दीन तहसीलदार आणि सिद्धार्थ दत्ता कदम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपींकडून अमली पदार्थ आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या कारवाईत रूपम टॉकीज परिसरात सृजल कृष्णनाथ पाटील या तरुणाला ताब्यात घेतले, तर त्याचे दोन साथीदार कृष्णा घोडसे आणि विजय कवळेकर हे फरार झाले. या आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या एका कारवाईत, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी जांबोटी मार्गावरील मच्छे गावच्या हद्दीत अवैध दारूची विक्री करणाऱ्या संदेश ईरप्पा नाईक याला अटक केली.

या कारवायांबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस पथकांचे कौतुक केले आहे.


Recent Comments