विजापूर तालुक्यातील कवलगी गावात लांडग्यांच्या कळपाने एका शेतकऱ्याच्या शेडमध्ये घुसून १५ ते २० मेंढ्यांचा फडशा पाडला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कवलगी आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक शेतकरी सोमनींग उताळी उर्फ पुजारी यांनी आपल्या घरासमोरील शेडमध्ये मेंढ्या बांधल्या होत्या. रात्रीच्या वेळी लांडग्यांच्या कळपाने या शेडवर हल्ला केला आणि मेंढ्यांचा जागीच जीव घेतला. या हल्ल्यामुळे पीडित शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे.

घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कवलगी येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मृत मेंढ्यांबद्दल योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments