Belagavi

कन्नडसक्तीविरोधी आंदोलनाची कन्नड संघटनांना धास्ती

Share

महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘महामोर्चा’ची धास्ती घेत कन्नड संघटनानी जिल्हाधिकाऱ्यांकडे आंदोलनाची परवानगी नाकारण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘महामोर्चा’ला विरोध करत, या आंदोलनाची परवानगी नाकारण्याची लोकशाहीविरोधी मागणी ‘कर्नाटक रक्षण वेदिके’च्या टी. ए. नारायणगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मराठी भाषिकांची अभूतपूर्व एकजूट पाहून बिथरलेल्या कन्नड संघटनेचे नेते दीपक गुडगनट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. म. ए. समितीची युवा समिती सीमाभागात बैठका घेऊन मराठी भाषिकांना जागृत करत असल्यामुळे कन्नड संघटनांचे धाबे दणाणले आहेत. २२ जूनच्या महामोर्चाला परवानगी दिल्यास बेळगावची कायदा व सुव्यवस्था बिघडेल, अशी वल्गना करत युवा नेते शुभम शेळके यांना तडीपार करावे आणि म. ए. समितीवर बंदी घालावी, अशी फुटकळ मागणीही त्यांनी केली आहे. .

कन्नड संघटनांच्या या दबावानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी म. ए. समितीच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. समितीने आपल्या मागण्या शांततापूर्ण मार्गाने मांडण्यास संमती दिली असून, ते मोर्चाच्या निर्णयावर ठाम आहेत. या संवेदनशील मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी लवकरच दोन्ही भाषिक संघटनांची संयुक्त बैठक बोलवणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Tags: