बेळगावच्या नेहरू नगरमधील कन्नड भवन येथे लिंगायत महिला समाजाचे वार्षिक संमेलन आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.


यावेळी डॉ. सुनिता पाटील यांनी, संस्थेच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी ज्येष्ठांचे अनुभव आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमात मधुमती हिरेमठ यांनी अध्यक्ष, रक्षा देगीनाळ यांनी सचिव, तर सरोजा निशांदार यांनी सहसचिव म्हणून पदभार स्वीकारला. याच वेळी रत्नप्रभा बेल्लद, डॉ. सुनिता पाटील आणि दुर्गा नाडकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
संमेलनात दिवंगत ज्येष्ठ कलाकारांना कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अश्विनी पाटील यांनी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. या सोहळ्याला दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments