Belagavi

मजगावच्या शांतीनाथ जैन मंदिरात भगवान धर्मनाथ मोक्ष कल्याणक उत्सव साजरा

Share

बेळगावमधील मजगाव येथील भगवान श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात जैन धर्माचे १५ वे तीर्थंकर भगवान श्री १००८ धर्मनाथ तीर्थंकर यांचा मोक्ष कल्याणक उत्सव धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

या उत्सवाचे औचित्य साधून णमोकार महामंत्राच्या पठणासह विविध धार्मिक विधी संपन्न झाले. या प्रसंगी परम पूज्य १०८ महानसागर मुनीजी यांनी आपल्या प्रवचनात, भाविकांनी अशा कल्याणक उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आचरणाचा लाभ घ्यावा आणि दैनंदिन जीवनात शुद्ध व सात्त्विक विचार ठेवून जैन धर्माच्या मूल्यांचा प्रचार करावा, असे आवाहन केले. उत्सवादरम्यान भाविकांनी मंदिरात भक्ती विधी आणि महाआरती केली, तसेच मुनीजींचे पादप्रक्षालन व शास्त्रदानही करण्यात आले.

या सोहळ्याला सुकुमार गौरन्ना, धरणेंद्र नरसगौडा, अजित पाटील, महेंद्र नरसगौडा, अशोक गौरन्ना, संतोष गौरन्ना, शोभा सुप्पन्नवर, भारती गौरन्ना यांच्यासह मजगाव गावची पंच कमिटी, युवक मंडळ, महिला मंडळ आणि पाठशाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: