फिनिक्स पब्लिक स्कूल आणि फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ व्या स्थापना सप्ताहानिमित्त मुला-मुलींच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली.

होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर या स्पर्धा पार पडत आहेत. या उद्घाटन समारंभाला आर. एल. एस. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. ज्योती कवळेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर फिनिक्स स्कूलच्या प्राचार्या निशा राजेंद्रन आणि कनक स्कूलचे प्राचार्य झाकीरहुसेन लष्करी यांची उपस्थिती होती.

शाळेच्या खेळाडूंनी क्रीडाज्योत पाहुण्यांकडे सुपूर्द केली. याप्रसंगी डॉ. ज्योती कवळेकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत खेळासोबतच अभ्यासही महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या १७ आणि १४ वर्षांखालील गटात चुरशीचे सामने झाले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात हेरवाडकर स्कूलने कॅन्टोन्मेंट स्कूलचा ४-१, सेंट पॉल्स स्कूलने संत मीरा स्कूलचा ६-०, इस्लामिया स्कूलने अंगडी स्कूलचा ७-१ आणि जैन हेरिटेज स्कूलने केएलई इंटरनॅशनल स्कूलचा २-० असा पराभव करत विजय मिळवला.
तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट पॉल्स स्कूलने जैन हेरिटेज स्कूलचा २-० असा पराभव केला. या गटातील इतर सामन्यांमध्ये सेंट झेवियर्स विरुद्ध अंगडी स्कूल आणि विद्यानिकेतन विरुद्ध संत मीरा स्कूल यांच्यातील सामने ०-० असे बरोबरीत सुटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका हिना मोकाशी, साक्षी कुकडोळी, नंदिका टी. एस. आणि इसरा जिनाबडे यांनी केले.


Recent Comments