Belagavi

उद्यमबाग येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली ५९ जिवंत काडतुसे!

Share

बेळगाव शहरातील उद्यमबाग या औद्योगिक क्षेत्रात महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा गोळा करण्याचे काम सुरू असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तब्बल ५९ जिवंत काडतुसे सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

महानगरपालिकेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे उद्यमबाग येथील रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा वेगळा करत असताना त्यांना ही जिवंत काडतुसे आढळली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ उद्यमबाग पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या एकूण ५९ काडतुसांपैकी ४१ काडतुसे एका प्रकारची आणि १८ काडतुसे दुसऱ्या प्रकारची आहेत.

सध्या उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रवीण बिरादार यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. ही काडतुसे या ठिकाणी कशी आली? ती कचऱ्यात कोणी टाकली? आणि त्यांचा कुठल्या गुन्ह्यासाठी वापर केला जाणार होता का? या सर्व बाजूने उद्यमबाग पोलीस तीव्र तपास करत आहेत. या अनपेक्षित घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags: