Belagavi

येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी वामन पाटील यांची बिनविरोध निवड

Share

येळ्ळूर म. ए. समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची घोषणा.
अध्यक्षपदी वामन पाटील तर कार्याध्यक्षपदी दुधप्पा बागेवाडी.
सीमा लढ्याला तीव्र करण्यासाठी येळ्ळूर ग्रामस्थ एकवटले.
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय.

सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी येळ्ळूर गावच्या मएस कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

आगामी काळातील सीमा लढा आणि मुंबईत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात संपूर्ण गावाने संघटितपणे सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला.

येळ्ळूर येथील यरमाळ जवळील जाधव फार्महाऊसवर रविवारी पार पडलेल्या बैठकीत १६ सदस्यीय समितीच्या नेतृत्वाखाली नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुतन अध्यक्ष म्हणून वामन पाटील, कार्याध्यक्ष म्हणून दुधप्पा बागेवाडी, उपाध्यक्ष म्हणून राजू पावले व प्रदीप देसाई, तर सरचिटणीस म्हणून प्रकाश अष्टेकर यांची निवड झाली. उपचिटणीसपदी बी. एन. मजूकर व उदय जाधव, खजिनदार म्हणून सतीश शिवाजीराव पाटील, तर उपखजिनदार म्हणून नागेंद्र पाखरे व डॉ. विवेक मेणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय, हिशोब तपासनीस म्हणून अनिल हुंदरे, सतीश मल्हारी देसूरकर, प्रा. सी. एम. गोरल यांची निवड झाली, तर २१ सदस्यांची जनसंपर्क प्रमुख म्हणून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये सुरज गोरल, दयानंद उघाडे, नागेश बोभाटे , यल्लाप्पा पाटील, सतीश कुगजी, श्रीकांत, धाकलू कवीनकोप, गणेश अष्टेकर, रमेश मो. धामणेकर, प्रकाश पाटील, अनंत गावडू पाटील, अनंत मा. तुळजाई, राकेश परीट, प्रकाश मालुचे, रमेश पाटील, रमेश धामणेकर, अनिल पाटील, भीमराव पुण्यान्नवर , कृष्णा शहापूरकर, शिवाजीराव पाटील आणि पांडुरंग पाटील यांच्यासह २१ सदस्यांची जनसंपर्क प्रमुख म्हणून समावेश आहे.

या बैठकीला शिवाजीराव पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: