बेळगाव येथील अरिहंत रुग्णालयात गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी आणि यकृत उपचारांना अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक ‘AI फायब्रोस्कॅन’ सुविधेचे उद्घाटन डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.

अरिहंत रुग्णालय आणि हैदराबादच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी (AIG) दरम्यान एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, हेपेटॉलॉजी आणि डायजेस्टिव्ह एंडोस्कोपी क्षेत्रात शैक्षणिक, वैद्यकीय ज्ञान, रुग्णांचे उपचार आणि संशोधनाला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल. नवीन फायब्रोस्कॅन प्रणालीमुळे यकृताचे आजार आणि फॅटी लिव्हरचे विनावेदने आणि वेळेत अचूक निदान करणे शक्य होणार आहे.

अरिहंत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. डी. दीक्षित यांनी सांगितले की, या करारामुळे रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचा लाभ मिळेल. डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी अरिहंत रुग्णालयाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. या प्रसंगी डॉ. वरदराज गोकाक, डॉ. गणेश कोप्पद, डॉ. सुरेंद्र हुगाले, डॉ. प्रभू हळकट्टी, डॉ. सूरज पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments