Belagavi

कपिलेश्वर मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त विशेष पूजा

Share

बेळगावचे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महादेवाला जेजुरीच्या खंडोबाच्या रूपात करण्यात आलेली विशेष आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोमवती अमावस्येच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजा अर्चा करण्यात आली. या पवित्र दिवशी कपिलेश्वर महादेवाला जेजुरीच्या खंडोबा देवाच्या रूपात भव्य आणि आकर्षक पोषाख व अलंकाराची आरास करण्यात आली आहे. सोमवती अमावास्येनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात विशेष अभिषेक, बिल्वार्चना आणि महाआरती पार पडली. भंडारा आणि फुलांच्या सजावटीने नटलेल्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी बेळगाव शहरासह आसपासच्या भागातील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

Tags: