Belagavi

केएलएस स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा शपथविधी

Share

बेळगावमधील नामांकित केएलएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नूतन विद्यार्थी संसदेचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. बेळगाव शहराचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी नारायण बरमणी यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थी नेत्यांना जबाबदारीची दीक्षा दिली.

बेळगावमधील केएलएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चालू शैक्षणिक वर्षाच्या पदाधिकारी पदग्रहण सोहळ्यात बेळगाव शहराचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी यांनी विद्यार्थ्यांना कर्तव्यपालनाची शपथ दिली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केएलएस शाळेचे चेअरमन पी. जी. बडकूंद्री होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्यातील नेतृत्वगुण विकसित करण्याचे आवाहन केले.

शाळेचे नूतन संसदेवर निवडून आलेल्या विद्यार्थी नेत्यांनी या वेळी अत्यंत शिस्तीने आणि जबाबदारीने आपले कर्तव्य बजावण्याची शपथ घेतली. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: