Belagavi

उपचाराअभावी गायीचा मृत्यू; गोरक्षक आक्रमक

Share

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या गायीचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्यामुळे बेळगावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग ४ वर काल संध्याकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक गाय गंभीर जखमी झाली होती. गोरक्षकांनी रात्री तातडीने खासगी डॉक्टरांना पाचारण करून तिच्यावर उपचार केले, मात्र मध्यरात्री या गायीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्यूनंतर महापालिका आणि टोल नाका प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

बेळगाव महापालिका क्षेत्रातील गोशाळेत कायमस्वरूपी पशुवैद्यक नसल्यामुळे सातत्याने गायींचा मृत्यू होत आहे. पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर आगामी काळात गायी आणि वासरांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा निलेश, प्रकाश लाडवा, विकी आणि अवधूत यांच्या नेतृत्वाखालील गोरक्षकांच्या पथकाने दिला आहे.

Tags: