बेळगाव मधील काँग्रेस भवनात आज ‘एसआयआर प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जागृत कर्नाटक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन एसआयआर संदर्भात जागृती निर्माण केली.


बेळगाव मधील काँग्रेस भवनात झालेल्या या विशेष कार्यशाळेत ‘जागृत कर्नाटक’ संघटनेचे संयोजक डॉ. वासू एच.व्ही. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत एसआयआर विषयातील तज्ज्ञ आणि संघटनेचे कार्यकारी समिती सदस्य असलेले तुमकूरचे आदम खान, उडुपीच्या सुचित्रा एस.ए. आणि समितीचे आणखी एक सदस्य फादर मार्टिन यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले.


स्थानिक नेते विनय नावलगट्टी आणि राहुल जारकीहोळी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला बुडा (BUDA) अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत उपस्थित तज्ज्ञांनी मतदार यादी पुनरीक्षणाबाबत (Voter List Revision) कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन केले, असे आयोजकांनी म्हटले.


Recent Comments