चिक्कोडी येथील शासकीय विश्रामगृहासमोर सुरू असलेल्या विकासकामादरम्यान सिमेंट-काँक्रीटचा भरलेला एक मिक्सर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मुख्य रस्त्यावरच उलटला.

हा काँक्रीट मिक्सर ट्रक रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामासाठी सिमेंट टाकत असताना अचानक उलटला. वजनाने अत्यंत जड असलेले हे वाहन रस्त्याच्या मधोमध आडवे झाल्यामुळे पादचारी आणि वाहनधारकांना मार्ग काढणे अत्यंत कठीण झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातातील ट्रक बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे.


Recent Comments