Chikkodi

चिकोडी: बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

Share

चिकोडी तालुक्यातील करोशी गावात घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे.

करोशी येथील रहिवासी राजू बडिगेर आणि मंगळा बडिगेर हे दांपत्य कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना ही चोरी झाली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे आणि आतील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून ३ तोळे सोन्याचे दागिने, २,००0 रुपये रोकड आणि एक ड्रिल मशीन घेऊन पोबारा केला. हे दांपत्य गावाहून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे पोलीस उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा सुगावा लावण्यासाठी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी चिकोडी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Tags: