विजापूरमध्ये उद्यापासून जिल्हास्तरीय ‘अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग सिटी लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य हौशी सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष राजू बिरादार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केंद्र सरकारचे क्रीडा प्राधिकरण आणि विविध स्थानिक सायकलिंग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. ही स्पर्धा विजापूरमधील अथणी रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहापासून सुरू होणार असून, यात व्यावसायिक सायकलपटूंसह सर्वसामान्य महिलांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.

या स्पर्धेत वयोगटानुसार विविध किलोमीटर अंतराच्या फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १३ वर्षांवरील मुलींपासून ते १९ वर्षांवरील महिलांसाठी व्यावसायिक आणि सामान्य अशा दोन्ही श्रेणींमध्ये सायकलिंग स्पर्धा पार पडणार आहेत.
स्पर्धेत २०० हून अधिक सायकलपटू भाग घेण्याची शक्यता असून विजेत्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. उद्या सकाळी ६ वाजता खासदार रमेश जिगजिणगी यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के. व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हा सायकलिंग संघटनेचे पदाधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments