Belagavi

बेळगावमधील न्यू गुड्सशेड रोडची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

Share

बेळगावमधील बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रोडची दयनीय अवस्था झाली आहे. या धोकादायक रोडची कायमस्वरूपी दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना गटारे बांधावीत, या मागणीसाठी मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

एल अँड टी कंपनीने काम केल्यापासून गेली अनेक वर्षे हा रोड खराब अवस्थेत असून दरवर्षी येथे केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. वर्षभर असणाऱ्या खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. उड्डाणपुलावरून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रोडची अधिक हानी होत असल्याने, पावसाचा जोर वाढण्यापूर्वी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि जलनिस्सारणाची योग्य व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

Tags: