कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या बेळगाव जिल्हा घटकाच्या वतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष टी. ए. नारायणगौडा यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


बेळगावमध्ये पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना फळवाटप करून हा वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून बेळगावमधील आंजनेय नगर येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.


यावेळी करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी आणि राज्य समन्वयक सुरेश गवन्नवर यांच्यासह करवेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.


Recent Comments