बेळगावमधील महाद्वार रोडवरील अष्टेकर गल्लीत एका नवविवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

रक्षिता पूजारी (वय २९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अवघ्या एक महिन्यापूर्वीच रक्षिताचा विवाह मंजुनाथ कृष्ण पूजारी यांच्याशी झाला होता. रक्षिता एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होती आणि सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ करत होती.

९ जून रोजी सकाळी रक्षिताने आपल्या आईला फोन करून, ती माहेरी न यायचे ठरवून पतीच्या घरीच राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर संध्याकाळपर्यंत तिचा फोन लागत नसल्याने काळजीपोटी कुटुंबीयांनी तिचे घर गाठले. घर आतून बंद असल्याने संशय आला आणि त्यांनी खिडकीतून पाहिले असता, रक्षिताने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रक्षिताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रक्षिता पतीच्या घरी सुखात होती, मात्र तिने नेमक्या कोणत्या कारणाने हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मानसिक तणावाततून तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments