Belagavi

कुडची पोलिसांची मोरब गावात हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड

Share

कुडची पोलिसांनी मोरब गावातील एका घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून १ हजार ७९० लीटर सडके रसायन आणि १० लीटर दारू जप्त केली आहे.

या प्रकरणी कुडची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोरब गावातील एका घरात अक्रमकपणे हातभट्टी दारू तयार करून विक्रीसाठी साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कुडची पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून दारू तयार करण्याचे साहित्य आणि बॅरल्स जप्त केले असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले आहे.

बेळगाव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये, गुंडगिरी किंवा जनतेमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांवर गुंडा कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला आहे.

Tags: