Belagavi

बेळगाव जिल्हा रुग्णालयातील १४९ वैद्यकीय विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

Share

बेळगाव जिल्हा रुग्णालयातील पात्र विद्यार्थ्यांना शासकीय योजनेअंतर्गत टॅबचे वाटप आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमात एमबीबीएस, बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग आणि पॅरामेडिकल विभागातील एकूण १४९ पात्र विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यात आले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि तंत्रज्ञानाची जोड मिळवून देण्याच्या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

संस्थेचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रत्येक टॅबलेटची किंमत सुमारे २६ हजार रुपये आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी शासनाने सुमारे ३६ ते ४० लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.

इंटरनेट सुविधेसह उपलब्ध असलेले हे टॅबलेट विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग, ई-लर्निंग आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: