Chikkodi

चिक्कोडीच्या श्रावणी अजणकट्टीला राष्ट्रपती ‘गोल्डन ॲरो’ पुरस्कार

Share

चिक्कोडी येथील श्रावणी रामचंद्र अजणकट्टी हिने भारत स्कौट्स, गाईड्स आणि बुलबुल विभागातील सर्वोच्च राष्ट्रपती ‘गोल्डन ॲरो अवॉर्ड – २०२६’ पुरस्कार पटकावला आहे.

प्रतिष्ठित सीटीई संस्थेच्या श्रीमती डी. के. शहा प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी श्रावणी रामचंद्र अजणकट्टी हिने भारत स्कौट्स, गाईड्स आणि बुलबुल विभागातील सर्वोच्च राष्ट्रपती ‘गोल्डन ॲरो अवॉर्ड – २०२६’ पुरस्कार पटकावला आहे. बेळगावमध्ये आयोजित विशेष समारंभात श्रावणीला हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

धारवाडचे निवृत्त उपसंचालक तथा भारत स्कौट्स आणि गाईड्सचे राज्य आयुक्त गजानन मन्नीकेरी आणि जिल्हा संघटक विठ्ठल नाईक यांच्या हस्ते श्रावणीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय पातळीवर शाळेचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सीटीई संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदाने श्रावणीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: