बेळगाव शहरात बेकायदेशीरपणे हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे.

बेळगावातील तांगडी गल्ली येथील महादेव मंदिराच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन विक्री करत असताना निखिल बळ्ळारी, कपिल होसूरकर आणि आकाश साळुंखे या तीन आरोपींना बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

या कारवाईत आरोपींकडून एकूण १०,३१,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान सदर अंमली पदार्थ मुंबईतील सायन कोळीवाडा येथील एका महिलेकडून आणल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपींविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीबी पथकाच्या या कामगिरीचे शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.


Recent Comments