Belagavi

मूडलगी तालुक्यात तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

Share

पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मूडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावात घडली आहे. या घटनेत दोन्ही अल्पवयीन भावांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

धर्मट्टी गावातील सागर बाबू मादर आणि प्रवीण बाबू मादर हे दोन भाऊ ग्रामपंचायत हद्दीतील तलावाच्या बाजूला गेले होते. शनिवार दुपारी दोन्ही भाऊ तलावाकडे गेले असता लहान भाऊ पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावानेही तलावात उडी घेतली. परंतु, दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद मूडलगी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या दुर्घटनेमुळे मादर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: