Belagavi

सुवर्ण विधानसौधमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

Share

मतदार याद्यांची विशेष पुनर्रचना आणि मॅपिंग प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमधील सुवर्ण विधानसौध येथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण विधानसौधमध्ये मतदार यादी पुनर्रचना आणि मॅपिंग प्रक्रियेबाबत बैठक झाली. जिल्ह्यातील १८ मतदारसंघांमध्ये २००२ च्या मतदार यादीच्या आधारे २०२५ च्या यादीची तपासणी सुरू असून, आतापर्यंत ९३ टक्के मॅपिंग पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठीच ही बैठक घेण्यात आली असून, मॅपिंगपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन बीएलओंद्वारे अर्ज भरून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. योग्य कागदपत्रांसह कोणताही रहिवासी मतदानापासून वंचित राहणार नाही, ही प्रशासन आणि राजकीय पक्षांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महत्त्वाच्या संयुक्त बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आणि महानगरपालिकेचे महसूल उपायुक्त सिद्धू हुल्लोळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Tags: