कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या के-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विजापूरमधील नामांकित एक्सीलंट सायन्स पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रँक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.


या परीक्षेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनुषा होसूर हिने कृषी विभागात राज्यात तिसरा आणि पशू वैद्यकीय विज्ञान विभागात राज्यात चौथा रँक मिळवला आहे. तर निखिल कित्तूर याने कृषी विभागात राज्यात १३ वा आणि पशू वैद्यकीय विज्ञान विभागात २० वा रँक मिळवून विजापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बसवराज कौलगी यांनी आनंद व्यक्त केला. कठोर परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच यश मिळते, याचेच हे उदाहरण आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांनी कृषी क्षेत्रात हे यश मिळवून पालकांचे स्वप्न साकार केले आहे, अशा शब्दांत बसवराज कौलगी यांनी कौतुक केले. महाविद्यालयाची ही यशाची परंपरा चालू वर्षातील इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे सांगत त्यांनी अभियांत्रिकी विभागातील गुणवंत आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयातील इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सलमान गोडीहाळ, प्रतीक चव्हाण, चेतन मठद, संकेत बिरादार, अनुष्का महिशाळे, रुमेजा शेख, मंजुनाथ होनवाड, आकाश गोरनाळ, शैलेश कुलकर्णी, रजत एन., रवी हळ्ळूर, अमोघ बोंबळेकर, मल्लिकार्जुन हूगार, सहाना माವಿನगिडद, मल्लिकार्जुन मुच्चंडी, अनुषा एडवण्णवर, निवेष मोगली, रुचीता घटनट्टी, चन्नवीरेश कुंभार आणि बसव गोळसंगी यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य मंजुनाथ मंजुनगोंड, शैक्षणिक समन्वयक मंजुनाथ तुम्मरमट्टी आणि व्यवस्थापन मंडळाच्या सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


Recent Comments