विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरातील कल्याण नगरमध्ये सांडपाण्याची वाहिनी फुटल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले असून, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कल्याण नगरमधील या समस्येमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून नागरिक आणि वाहनधारकांना उघड्या नाल्यासारख्या झालेल्या रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ही समस्या जशीच्या तशी असून पादचाऱ्यांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही वाहिनी त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी सिंदगीमधील संतप्त नागरिकांनी केली आहे.


Recent Comments