Belagavi

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई

Share

बेळगावमध्ये विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध भागात छापे टाकूनसार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या सात जणांवर आणि बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

मारिहाळ पोलिसांच्या हद्दीत सुळभावी-मोदगा रस्त्यावर खुल्या जागेत दारू पिणाऱ्या दुंडय्या हिरेमठ आणि रेवस्त्था पाटील यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. मार्केट पोलिसांनी जुन्या भाजी मार्केट जवळ कारवाई करत राहुल जाधव आणि आकाश लोहार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काकती पोलिसांनी अलतगा खडी मशीनजवळ दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अबुबकर शाहपूरकर, समीर शेख आणि बसवंत दोंडे यांना मद्यप्राशन करताना रंगेहात पकडले.
हिरेबागेवाडी पोलिसांनी बस्तवड गावाजवळ लोकांना दारू पिण्यास जागा देणाऱ्या परशुराम हणमतांचे याला अटक केली, तर हुलगवी गावात बेकायदेशीर दारू बाळगणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेऊन दारूसाठा जप्त केला आहे.

या सर्व कारवाया करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

Tags: