airshow

बेळगावमध्ये वायुसेनेचे शानदार हवाई प्रदर्शन

Share

बेळगावमधील सांबरा वायुसेना प्रशिक्षण केंद्रात जगप्रसिद्ध ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रदर्शन पथकाचे हवाई प्रदर्शन पार पडले. वायुसेना अग्निवीरांच्या सातव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपताच आकाशात सुरू झालेल्या या कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली.

जगातील एकमेव पाच हेलिकॉप्टरचे प्रदर्शन पथक असलेल्या ‘सारंग’ टीमने बेळगावच्या आकाशात आपली कलाकुसर दाखवली. स्वदेशी बनावटीच्या एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर्सचा वापर करून या पथकाने हवेत विविध प्रकारची साहसी प्रात्यक्षिके सादर केली. आकाशात उंच झेप घेत हेलिकॉप्टर्सनी रेखाटलेल्या वेगवेगळ्या रचनांनी प्रेक्षकांना थक्क केले.

या सोहळ्याला कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अभिजित कुमार आणि एअर कमांडर सूरज शंकर उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या कामगिरीचे कौतुक करून सारंग पथकाच्या हवाई प्रदर्शनाची प्रशंसा केली.

Tags: