बेळगावमधील अल इक्रा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने वार्षिक संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एसएसएलसी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले.

अल इक्रा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने वार्षिक संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकाने गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, जमात-ए-इस्लामीचे माजी अध्यक्ष शाहिद मेमन, डॉ. माधव प्रभू, डॉ. अभिलाष एस., नगरसेवक समीउल्ला मडीवाळे, अल इक्रा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष शाहनवाज अहमद खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांची जोपासना करावी आणि समाजात सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन जमात-ए-इस्लामीचे माजी अध्यक्ष शाहिद मेमन यांनी केले.
सोसायटीच्या वतीने राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम आणि भविष्यातील योजनांची माहिती अब्दुल कादीर कालकुंद्री यांनी दिली.
या सोहळ्याला मोहम्मद अली हुक्केरी, rशीद मनियार, शफाकत मिया जमादार, जावेद पठाण, इम्तियाज खान पठाण, रझा मिया जमादार, फहीम मडीवाळे, नूरुद्दीन शेख सुरब, आरिफ मेस्त्री, आफताब आलम मडीवाळे, सईद अहमद मुजावर यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments